कामठी :-बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अनव्ये वंचित व दुर्बल घटकातील बालकाकरिता इंग्रजी माध्यम, विना अनुदानित शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे.सण 2021-2022 या शैक्षणिक वर्षाकरिता घेण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया थंडबसत्यात असून कामठी तालुक्यातील 393 जागेसाठी 391 जणांची निवड करण्यात आली आहे.
कामठी तालुक्यातील 40 शाळेमध्ये 391 मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे.1 ऑक्टोबर 2014 ते 31 डिसेंबर 2015 या कालावधी दरम्यान जन्मलेली बालके ओंलाईन प्रवेश नोंदनिकरिता पात्र राहणार आहेत .कामठी तालुक्याच्या गटसाधन केंद्रात मदत व तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आले आहेत.
कामठी तालुक्यातील 40 शाळेत 393 जागेसाठी आलेल्या हजारो अर्जातून 391 जणांची निवड करण्यात आली आहे.त्यानंतर किती विद्यार्थ्यांचे नाव दाखल केले जाते त्यानंतर जागा शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी कश्यप सावरकर यांनी दिली.