Published On : Sat, Dec 9th, 2017

एका क्लिकवर पाठवा स्वच्छतेसंदर्भात तक्रार

Advertisement


नागपूर: स्वच्छतेसंदर्भातील तक्रारी करण्यासाठी नागपूरकरांना आता मनपाच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. एका क्लिकवर कुणीही व्यक्ती छायाचित्र काढून स्वच्छतेसंदर्भातील तक्रार करू शकतो. नागपूर महानगरपालिकेतर्फे त्याची तातडीने दखल घेऊन ती सोडविण्यात येईल. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर ‘स्वच्छता ॲप’ डाऊनलोड करणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि ‘स्वच्छ नागपूर’च्या दिशेने अग्रेसर होण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनतर्फे आज व्हेरायटी चौकातील इटर्निटी मॉल येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले.

ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी शनिवारी (ता. ९) सकाळी ११ वाजतापासून मॉलमध्ये प्रवेश घेण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीला याबाबत माहिती दिली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘Swachhata MoHUA App’ लॉन्च करण्यात आले आहे. आपल्याजवळील मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करायचे. जेथे अस्वच्छता आहे त्या ठिकाणाचे छायाचित्र काढायचे. लोकेशन लिहायचे आणि अपलोड करायचे. ही तक्रार नागपूर मनपाला प्राप्त होईल. मनपाच्या स्वच्छता विभागातर्फे याची तातडीने दखल घेतली जाईल आणि ती अस्वच्छता दूर करण्यात येईल, असे या ॲपचे कार्य आहे. आपण स्वच्छतेबद्दल जागरूक व्हा आणि नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर करण्यात मदत करा, असे आवाहन स्वयंसेवकांनी केले. नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिवसभरात सुमारे ८०० नागरिकांनी स्वच्छता ॲप डाऊनलोड केले. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने ४ डिसेंबरपासून जनजागृती अभियान हाती घेण्यात आले असून आतापर्यंत सुमारे २४०० नागरिकांनी ॲप डाऊनलोड केले असल्याची माहिती ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी दिली.


नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या अभियानाला यशस्वी करण्यासाठी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, कल्याणी वैद्य, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, लिपीशा कचोरे, पूजा लोखंडे, विष्णूदेव यादव, अभय पौनीकर, विकास यादव यांच्यासह सुमारे २० स्वयंसेवकांनी तसेच मनपाच्या स्वास्थ निरिक्षकांनी अभियानात सहभाग घेतला. इटर्निटी मॉलचे व्यवस्थापक आशीष बारई यांचे नागपूर मनपा व ग्रीन व्हिजीलतर्फे सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


शाळांमध्येही जनजागृती
नागपूर शहरातील शाळांमधूनही याबाबत जनजागृती सुरू आहे. शनिवारी नारायणा विद्यालय आणि परांजपे शाळेतील शिक्षक-पालक सभेत ॲप डाऊनलोड करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. झोनस्तरावरही विविध ठिकाणी अभियान राबविण्यात आले.

Advertisement