Advertisement
नागपूर: मातृ दिनाचे औचित्य साधून ‘बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ’ अभियानांतर्गत मनापाच्या वतीने ‘सेल्फी’ पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आईप्रति कृतन्यता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन. नागपूर महानगरपालिका या निमित्ताने ‘बेटी बचाओ’चा जागर करीत आहे. मनपा सोशल मीडिया च्या माध्यमातून आई सोबत काढलेले सेल्फी प्रकाशित करून नागपूरकराना या अभियानात सहभागी करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी १४ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळात nmcngp.media@gmail.com या इ मेल आयडी वर अथवा 8888896867 या क्रमांकावर आई सोबत काढलेला सेल्फी व्हाट्सएप्प करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.