मॅरेथॉनच्या निमित्ताने नागपूर मेट्रो प्रकल्पाची माहिती
नागपूर: महा मेट्रो तर्फे प्रवासी वाहतूक सुरु होत त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच आज शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी मेट्रो राईडचा आस्वाद घेतला. मेट्रोच्या सीताबर्डी इंटरचेन्ज स्थानकापासून तर खापरी दरम्यान या ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला. सुमारे १० – १२ ज्येष्ठांनी यात सहभाग घेतला.
प्रवास करणाऱ्या या ज्येष्ठांनी मेट्रो च्या ऐयर पोर्ट स्टेशनवरील विरंगुळा केंद्राला भेट दिली. तिथे ठेवलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीं संबंधी च्या साहित्याचे वाचन देखील केले. मेट्रोचा प्रवास आपल्या करता अवर्णनीय होता कारण शहराचे सौंदर्य वरतून बघण्याचा आपल्याला यामुळे योग्य आला असे ते म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोतर्फे प्रत्येक स्टेशनवर तसेच मोठ्या प्रमाणात सुरक्षेचे उपाय केले आहे. या सर्व उपाय योजनांची तारीफ करत मेट्रोने प्रवास करणे अतोषाय सुरक्षित असल्याचे मत गिरीजा शंकर अग्रवाल, व्यापारी यांनी व्यक्त केले. तर आपण आपल्या मित्र परिवारामध्ये मेट्रोने प्रवास करण्या संबंधी आपण जागरुकता निर्माण करणार असल्याचे प्रेम नारायण त्रिवेदी,
निवृत्त ज्येष्ठ नागरिक म्हणाले.
मॅरेथॉनच्या निमित्ताने महा कार्डचे प्रमोशन:*, नागपुरात उद्या (२२ नोव्हेंबर) रोजी होऊ घातलेल्या मॅरेथॉनच्या निमित्ताने आज महा मेट्रो तर्फे या संपूर्ण प्रकल्पाची माहिती देण्यात आली. नागपुरातील प्रतिष्ठित डॉ अमित समर्थ यांच्या प्रो हेल्थ फाउंडेशन तर्फे उद्या मॅरेथॉनचे आयोजन झाले असून त्याच्या पूर्व संध्येला एकत्र आलेल्या सर्व सायकल स्वारांच्या दरम्यान मेट्रो प्रकल्पाची माहिती देण्यात आली. या दरम्यान महा कार्ड चे प्रमोशन करण्यात आले. सर्व सायकल स्वारांनी आणि खुद्द डॉ समर्थ यांनी मेट्रो प्रकल्प शहराकरता एक वरदान असल्याचे सांगितले.