नागपूर : महाराष्ट्रात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्यात आज मतदान पार पडत असून सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदार आपला मतदानाचा हक्का बजावू शकणार आहेत. दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. नागपूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली असून सर्वसामान्य नागरिकांसह दिग्गज नेतेमंडळी मतदान करीत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे. दक्षिण पश्चिम नागपूरचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी मतदानाचा हक्क बाजाला आहे.
दरम्यान नागपूर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सहा मतदारसंघ शहराच्या सीमेत आहेत तर सहा ग्रामीण भागात आहेत. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४५ लाख २५ हजार ९९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.नागपूर : महाराष्ट्रात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्यात आज मतदान पार पडत असून सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदार आपला मतदानाचा हक्का बजावू शकणार आहेत. दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे.
नागपूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली असून सर्वसामान्य नागरिकांसह दिग्गज नेतेमंडळी मतदान करीत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे. दक्षिण पश्चिम नागपूरचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे, उत्तर नागपूरचे उमेदवार नितीन राऊत,दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव यांनी मतदानाचा हक्क बाजाला आहे.
दरम्यान नागपूर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सहा मतदारसंघ शहराच्या सीमेत आहेत तर सहा ग्रामीण भागात आहेत. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४५ लाख २५ हजार ९९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.