Advertisement
मुंबई :मुंबईत आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मंत्रालयासमोरील इमारतीवरुन या तरुणीने उडी घेत आपले जीवन संपविले. लिपी रस्तोगी असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती 26 वर्षांची असून पोलिसांना घरातून सुसाईड नोटही जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विकास रस्तोगी हे १९९७ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. लिपी रस्तोगी ही अभ्यासात तितकीशी पुढे नव्हती. त्यामुळे ती नैराश्यात होती. आई-वडील इतके मोठे अधिकारी असून आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही अशी भीती लिपी रस्तोगीला सतावत होती. त्यातूनच तिने आयुष्य संपवल्याची चर्चा मंत्रालय परिसरात चर्चा आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.