नागपूर : पत्रकारितेत ४५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांचा रविवारी नागपूर प्रेस क्लब आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्टतर्फे प्रेस क्लब येथे सत्कार करण्यात आला. यावेळी राव यांनी त्यांना पत्रकारितेत आलेल्या अनुभवाच्या आठवणींना उजाळा दिला. पत्रकारिता क्षेत्रातही दिवसेंदिवस स्पर्धा रंगत चालल्या आहेत. त्यामुळे यक्तिक संबंधांमध्ये कटुता निर्माण होण्याची भीती असते. मात्र याठिकाणी प्रत्येकाशी मैत्रीचे नाते जोपासणे गरजेचे आहे.जोसेफ राव यांनी पत्रकारिता करताना इतरांशी स्पर्धा नक्कीच केली. मात्र, ती स्पर्धा करतांना त्यांनी आपली मैत्री जपली, असे राव सोहळ्या दरम्यान म्हणाले
.
राव यांच्या सत्कार सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, प्रदीप मैत्र, चंद्रशेखर जोशी, बाळ कुलकर्णी, रामू भागवत तसेच उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांनी आपले मत मांडले. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जोसेफ राव यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, असे प्रफुल्ल मारपकवार म्हणाले. प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्रे यांनी आपल्या जोसेफ राव यांच्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाल्याचे म्हणाले.
राव यांनी पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण कसे केले यासंदर्भात त्यांनी स्वतः माहिती दिली.माझ्या कुटुंबातील कोणताच व्यक्ती पत्रकारितेत नव्हता. माझे आजोबा रोज वृत्तपत्र वाचत असल्याने मलाही वाचनाची सवय लागली. एके दिवशी बाजारात एक वस्तू विकत घेण्यासाठी गेलो असता वृत्तपत्राचा एक कागद हाती लागला. त्यावर असलेल्या वार्ताहरासाठीच्या नोकरीची जाहिरात वाचून मी त्याठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलो. त्यानंतर कधीच मागे वळून पहिले नाही. पत्रकारितेचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत गेले त्यानुसार मी पण स्वतःमध्ये बदल करत गेलो. यादरम्यान आलेल्या अनेक अनुभवांनी समृद्ध होत गेलो, असेही राव म्हणाले.