Advertisement
धुळे – धुळ्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला अपघात झाला आहे.
उस्मानाबादला जात असताना ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील विंचूर शिवारातील बोरी नदीच्या पुलावरून मजूर घेऊन जाणारी पिकअप व्हॅन खाली कोसळली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 महिला आणि 5 मुलांचा समावेश आहे.
जखमींना तातडीने उपचारासाठी धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील मजूर उस्मानाबादकडे जाताना हा भीषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.