Published On : Sat, Oct 7th, 2017

सरपंचासह सात सदस्य बिनविरोध

Advertisement

काटोल: राज्याच्या उपराजधानी असलेल्या नागपुर जिल्हयातील काटोल तालुक्यातुन मतदारांमधून थेट अविरोध सरपंच होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पांजरा (काटे)ग्रामपंचायतीच्या सौ.विजुताई युवराज सरवरे यांना मिळाला आहे. तसेच ग्रा.प. सदस्य पदाचे उमेदवार 1) संजय पुंजाराम सावरकर,2) राजेंद्र पुंड़लिक चरडे, 3)अमोल वसंता वाघाडे, 4) सौ.वर्षा विनोद भलावी, 5) सौ.कविता अनिल सरोदे, 6)सौ.लता पांडूरंग धर्मे, 7) सौ.भारती देविदास मुंगभाते यांचे उमेद्वारी होती. परंतु यांचे विरोधात उमेदवारी अर्ज न आल्याने सरपंचा सह सातही उमेदवार हे अविरोध ग्रा.प.सदस्य निर्वाचित झाले आहेत.

पांजरा काटे येथील बिनविरोध निवडलेल्या नवनियुक्त सरपंच व सदस्यांचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी अभिनंदन केले यावेळी प्रा.भास्कर पराड , चंद्रशेखर चिखले, जयंत टालाटुले, ज्ञानेश्वर कोचे, विश्वनाथ चंदनखेडे, पुंजाराम सावरकर, मानकर गुरूजी, शालिक इखार, प्रदीप केवटे, मनोहर सरोदे, रायुका तालुकाध्यक्ष प्रशांत खंते, रा वि का जिल्हाउपाध्यक्ष आकाश गजभिये आदी उपस्थित होते.

Today’s Rate
Tuesday 12 Nov. 2024
Gold 24 KT 75,900 /-
Gold 22 KT 70,600 /-
Silver / Kg 90,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement