Published On : Tue, Jul 25th, 2023

मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्या प्रकरणी सातव्या आरोपीला अटक ; इतरांचा शोध सुरूच

Advertisement

मणिपूर : जमावांकडून मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. पोलिसांनी मागच्या गुरुवारी पहिल्या आरोपीला अटक केली.

आता पोलिसांनी या प्रकरणातल्या सातव्या आरोपीला अटक केली आहे. तसंच पोलिसांकडून या व्हिडीओत दिसणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी एकजण अल्पवयीन आहे अशीही माहिती समोर आली आहे.

Advertisement

अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीच्या आधारे पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहे.

४ मे २०२३ ला मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. ही धक्कादायक घटना तब्बल दोन महिन्यानंतर उघडकीस आली. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.