मुंबई : रत्नागिरी शहरामध्ये रविवारी ठाकरे गटाची सभा झाली पार पडली.मात्र ठाकरेंच्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवल्याचा आरोप निलेश राणे आणि मंत्री उदय सामंत यांनी केला. यावरून सामंत यांनी ठाकरे गटाकडे 13 आमदार आहेत त्यातील 5-6 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत, असा दावा केला आहे. तसेच ठाकरेंचे खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे ते म्हणाले.
रत्नागिरी शहरामध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा सभा प्रभागनिहाय झाल्या आहेत. प्रत्येक सभेला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे पाहता नारायण राणे यांना लोकसभेत नक्की पाठवू,असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. कालच्या ठाकरेंच्या सभेत रत्नागिरीत आल्यानंतर कोकणच्या विकासासाठी काय करणार आहोत हे मुद्दे आवश्यक होते परंतु रिफायनरीला आमचा विरोध राहील अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात आले.
केंद्र शासनाला रिफायनरी व्हावी यासाठी एकीकडे पत्र देता. तुमचे आमदार रिफायनरीला समर्थन देतात तर खासदार विरोध करतात.
नक्की तुमची भूमिका काय आहे? असा सवाल सामंत यांनी ठाकरे यांना विचारला आहे. ठाकरे गटाकडे 13 आमदार आहेत त्यातील 5-6 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत, 2-3 खासदार आहेत ते पण संपर्कात आहेत, असेही सामंत म्हणाले. महायुतीत शिंदे गटाच्या उरलेल्या जागेवर एकनाथ शिंदे उमेदवार जाहीर करतील, असे सामंत म्हणाले.