Published On : Thu, Nov 21st, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील अजनी फ्लायओव्हरवर भीषण अपघात;निष्काळजीपणे पार्क केलेल्या ट्रकला कारची धडक, एकाचा मृत्यू

नागपूर : येथील धंतोली पोलिसांच्या हद्दीतील अजनी फ्लायओव्हरवर मंगळवारी, १९ नोव्हेंबर रोजी निष्काळजीपणे पार्क केलेल्या आयशर ट्रकला कार आदळल्याने भीषण अपघाताची घटना घडली.

या अपघातात ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मोहम्मद फारूख असे मृतकाचे नाव आहे. तर विनोद संजयराव नाईक (35, पुलगाव, वर्धा) असे आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे.

Gold Rate
Friday 24 Jan. 2025
Gold 24 KT 80,700/-
Gold 22 KT 75,100/-
Silver / Kg 91,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहितीनुसार, येरखेडा रोड, इस्लामपुरा, बनकर कॉलनी, न्यू कॅम्पटी येथील रहिवासी मोहम्मद हारूल हे त्यांची हुंडाई सँट्रो (नोंदणी क्र. एमएच 31 सीएम 3279) कार चालवत विमानतळाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाने भरलेला ट्रक चालकाने निष्काळजीपणे उड्डाणपुलावरच पार्क केला होता. चालकाने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना सावध करण्यासाठी योग्य वाहतूक चिन्हे न लावता हे ट्रक उड्डाणपुलावर सोडले होते. परिणामी, मोहम्मद फारूकची कार थांबलेल्या ट्रकवर आदळली, त्यामुळे फारूकला आपला जीव गमवावा लागला.

Advertisement