नागपूर :नागपूर-वर्धा रोडवर एका थांबलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने धडक दिली. रात्रीच्या अंधारात झालेल्या या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था काही काळाकरिता विस्कळीत झाली होती.
गुरुवारी रात्री, नागपूरच्या बेलतरोडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर-वर्धा रोडवर, एका ट्रकमध्ये अचानक बिघाड झाला आणि चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. त्यानंतर काही वेळातच त्याच रस्त्यावरून येणारा दुसरा ट्रकने उभ्या ट्रकला धडक दिली.
ट्रक चालक ट्रक खूप वेगाने गाडी चालवत असल्याची माहिती आहे.
या अपघातात ट्रक चालकाचा वेदनादायक मृत्यू झाला.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.