Published On : Thu, May 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रातील मराठवाड्यात पाणीटंचाईची भीषण समस्या; प्रशासनाकडून टँकरचा पुरवठा

Advertisement

– महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील अठरा गावे आणि चार वस्त्यांमधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची मदत घेण्यात आली आहे, असे प्रशासनाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या अहवालात प्रशासनाने मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ४४७ विहिरी अधिग्रहित केल्या असल्याची माहिती दिली.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उन्हाळ्यामुळे मराठवाड्यात विविध ठिकाणी पाण्याची समस्या भेडसावत आहे. जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील अठरा गावे आणि चार वाड्यांना (वस्ती) पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यापैकी , 10 गावे आणि चार वस्त्या जालन्यातील आहेत, तर आठ गावे हिंगोलीतील असल्याचे अहवालात म्हटले आहे.

लोकांच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रशासनाने मराठवाड्यातील एकूण आठ जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद आणि जालना प्रत्येकी 85, हिंगोलीमध्ये 177, नांदेडमध्ये 108, बीडमध्ये 54, 11 अशा एकूण 447 विहिरींचे अधिग्रहण केले आहे. तसेच यात लातूरचाही समावेश आहे. मात्र, विभागातील उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात विहिरींचे अधिग्रहण केल्या गेले नसल्याची माहिती आहे.

Advertisement
Advertisement