महापालिकेकडून जनजागृती नाही, सामान्य नागरिक समस्यांनी त्रस्.
नागपूर: प्रशासक नियुक्ती व माजी नगरसेवकही नॉट रिचेबल झाल्याने सामान्य नागरिक सिवेज लाईन, कचरा गाडी, दुर्गंधी आदी किरकोळ समस्यांनी त्रस्त झाला आहे. महापालिकेने अद्यापही सामान्य नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक किंवा संपर्कासाठी अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले नाही. त्यामुळे समस्येच्या तक्रारी कुठे करायच्या, याबाबत सामान्य नागरिक अजूनही अनभिज्ञ असून संतापलेल्या काही नागरिकांनी सोशल मिडियावर समस्या टाकून महापालिकेचे धिंडवडे काढणे सुरू केले आहे.
माजी नगरसेवक समस्यांकडे लक्ष देत नसून महापालिकेचे अधिकारीही ऐकत नसल्याने प्रभागांमध्ये समस्यांचा डोंगर तयार होत आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर तक्रार करणे शक्य आहे. परंतु यासंदर्भात माहितीच नसल्याने सुशिक्षितांचीही परवड होत आहे. त्यामुळे नागरिकांनी वेब नागपूर या पोर्टलवर जाऊन त्यांची समस्या महापालिकेच्या संकेतस्थळावर करू शकतात, असे सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी सांगितले. पारसे यांनी तयार केलेल्या www.webnagpur.com या संकेतस्थळाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मागील वर्षी लोकार्पण करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर ‘महापालिका तक्रार’ यावर क्लिक करून नागपूरकरांना थेट दिवानखान्यातूनच तक्रार नोंदविता येते. सद्यस्थितीत नागरिकांसाठी महापालिकेने तक्रार करण्यासाठी कुठलेही व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही.
महापालिकेचे ॲप असले तरी त्याबाबत जनजागृतीही केली नाही. प्रशासक नियुक्तीनंतर माजी नगरसेवकांनीही प्रभागातील समस्यांबाबत हात वर केले आहे. अनेकदा समस्येबाबत फोन केल्यानंतरही माजी नगरसेवक प्रतिसाद देत नाही. अशावेळी नागरिक झोन कार्यालयात समस्या घेऊन जातात. परंतु अधिकारी त्यांना टाळतात किंवा एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरायला लावत आहेत. त्यामुळे आता संतप्त नागरिकांनी सोशल मिडियाचा आधार घेत त्यावर थेट समस्याच टाकण्यास सुरुवात केली आहे. या समस्यांबाबत उहापोह करून महापालिकेचे धिंडवडे काढले जात आहे. परंतु अजूनही महापालिकेकडून दखल घेतली जात नसल्याने सामान्य नागरिकांच्या नाराजीचे रुपांतर संतापात होण्याची शक्यता बळावली आहे.
कोट्स…
महापालिकेसंदर्भात वेबनागपूर या निःशुल्क असलेल्या पोर्टलवर जाऊन महापालिका तक्रार यावर क्लिक केल्यास मनपाच्या संकेतस्थळावरू जाऊन तक्रार नोंदविता येते. तक्रार नोंदविल्यानंतर त्याचा क्रमांक मिळतो. याच मनपाच्या संकेतस्थळावरून तक्रारीचा निपटारा झाला अथवा नाही, याबाबतही कळते. केवळ महापालिकाच नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सातबारा काढणे, पाहणे, आधार कार्ड डाऊनलोड करणे, अपडेट करण्यासोबत बऱ्याच सुविधा वेबनागपूरवर आहे.
– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.
www.webnagpur.com