नागपूर: नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने (एसएसबी) बोरगाव रोड, गिट्टीखदान येथील वेला युनिसेक्स स्पॅलॉन अँड ॲकॅडमीमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.या प्रकरणी अनुशुल मनोज बावनगडे (३०) आणि त्याची पत्नी सीमा (रा. बुद्ध नगर,पाचपावली) यांना अटक करण्यात आली आहे
माहितीनुसार, एसएसबीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविता इसरकर यांना द वेला युनिसेक्स स्पॅलॉन अँड ॲकॅडमीच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवल्या जात असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी याठिकाणी सापळा रचून येथे सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला.
याठिकाणी आरोपी जोडप्याने महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास भाग पाडल्याचे तपासात उघड झाले आहे.पोलिसांनी या परिसरातून १.९२ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. या जोडप्याविरुद्ध पेटा कायद्याच्या कलम ४ आणि ५७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) आणि डीसीपी (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसबीच्या पथकाने पी. कविता इसरकर, पोलिस कॉन्स्टेबल सचिन बडिये, प्रकाश माथनकर, लक्ष्मण चवरे, पोलिस अमलदार अजय पौनीकर, कमलेश क्षीरसागर, कुणाल मसराम यांनी केली.