नागपूर : सक्करदरा परिसरात सलूनच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने सोमवारी पर्दाफाश केला. शीला कैलाश भोवते (३८ रा. चामट चक्की रोड, नंदनवन ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
यादरम्यान पोलिसांनी चार महिलांची सुटका केली. पोलिसांनी चौकशीदरम्यान त्यांच्याकडून 1,500 रुपये आणि 11,590 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे.
माहितीनुसार, सक्करदरा येथील संगम टॉकिस रोडवर असलेल्या केसी फॅमिली सलूनमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून डमी ग्राहक केसी फॅमिली सलूनमध्ये पाठवला. रक्कम भरल्यानंतर डमीने पोलिसांना येण्याचा इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी सलूनवर छापा टाकला. पिडीत महिलांना पैशांचे आमिष दाखवून जबरीने देहव्यवसाया ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी PITA कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.