नागपूर : शहरातील सीताबर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत धरमपेठ येथील आनंद भंडार बिल्डींगमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखा पोलिसांनी भांडाफोड केला. नेचर ब्युटी सलूनमध्ये स्पाच्या नावाखाली देहपव्यापारचा प्रकार सुरु होता. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तीन पीडित महिलांची सुटका केली आहे. आकांशा उर्फ रितीका उर्फ कुमुद हिरालाल मेश्राम (वय 26 वर्ष, रा. रामनगर) आणि सोफिया उर्फ नितु जाकिर शेख, (वय 30 वर्ष, रा. वार्ड नं. 05, नुर नगर, कोरडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत.
माहितीनुसार,आरोपी महिला स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मुलींना / महीलांना पैशाचे आमिष दाखवून मसाज पार्लरच्या नावाखली देहव्यापारास प्रवृत्त करण्यात येत होते. गुन्हे शाखा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून देहव्यपराचा भंडाफोड केला.
आरोपींकडून पोलिसांनी 1 लक्ष दहा हजार 520 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सीताबर्डी पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध अप क्र. 681/2024 कलम 143 भारतीय न्याय संहीता सहकलम 4. 5, 7, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.