नागपूर : शहरातील वर्धा रोड येथील प्राईड हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. मंगळवारी सकाळी नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (एसएसबी) याप्रकरणाचा छडा लावत द प्राईड हॉटेलमध्ये छापेमारी केली. यादरम्यान दोन रशियन मुलींची सुटका करण्यात आली असून बंदि उर्फ बिलाल अहमद ( वय ३७ वर्षे रा. शंभू नगर, प्लाट ०७, मानकापूर), राजकुमार गडेलवार ( वय ४० वर्षे रा. कामठी रोड,विम्स हॉस्पीटल, सदर )या दलालांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ३ पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.
यासोबतच आरोपीकडून ६ मोबाईल हॅण्डसेट, नगदी रक्कम, एक चारचाकी वाहन, दोन्ही रूममधून 5 कंडोम असा एकूण 10,51,500/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त अश्वती दोर्जे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मुम्मका सुदर्शन, सहा पोलीस आयुक्त मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे, सपोनि माधुरी नेरकर, अनिल अंबाडे,पो.आ समीर शेख, अश्विन मागे, संदीप चांगोले, सुभाष चौधरी, मपोहवा रीना यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.
दरम्यान नागपुरात देहव्यापाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. याठिकाणी देहव्यापारासाठी अल्पवयीन मुलींची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असून त्याचे केंद्रबिंदू नागपूर असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने देखील आपल्या नव्या अहवालात त्यावर शिक्कामोर्तब केले होते.