माजीमंत्री बावनकुळेंनी केली सुरुवात.
कोराडी : ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना मास्कची पेटी देताना माजीमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे, श्री श्री फाऊंडेशनचे पदाधिकारी व इतर.
नागपूर: शहरासह नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत परिसरात निःशुल्क मास्क वितरण व सोशल मिडियावर कोरोनाबाबतच्या अफवांना आळा घालण्यासाठी जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली. श्री श्री फाऊंडेशनचे संकेत बावनकुळे व सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांच्या या संयुक्त मोहिमेला माजी पालकमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरुवात केली.
कोरोनाचे रुग्ण, बळीसंख्या वाढत असली तरी अजूनही नागरिक मास्क वापरत नाही. ग्रामीण भागात तर परिस्थिती शहराच्या तुलनेत आणखीच वाईट आहे. त्यामुळे शहरासह नगर पालिका, नगर पंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रातही मास्कचे निःशुल्क वाटपासाठी श्री श्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे व अजित पारसे यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला. काल, बुधवारी कोराडी येथे माजी पालकमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पारसे यांच्या उपस्थितीत मास्क वाटप व जनजागृती मोहिमेला सुरुवात केली.
यावेळी नरखेड, कामठी, मौदा, महादुला, उमरेड येथील भाजपा पदाधिकाऱ्यांना तसेच नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचाय सदस्यांंना वाटप करण्यासाठी आमदार बावनकुळे यांच्या हस्ते मोठ्या संख्येने मास्क देण्यात आले. शहरात सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, उद्यान, चौकासह ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत मास्क वाटप करण्यात येणार आहे. गेल्या अऩेक दिवसांपासून ही मोहिम राबविण्यात येत आहे. आता ग्रामीण भागातील प्रत्येक वस्ती, घरांपर्यंत निःशुल्क मास्क पोहोचविण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, भाजयुमो नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आदर्शजी पटले, श्री श्री फाउंडेशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सोशल मिडियावर कोरोनाबाबत अफवांमुळे दुसऱ्या लाटेत अनेक मृत्यू झाले. या अफवा कशा टाळायच्या, त्याचा कुठलाही परिणाम होऊ नये, यासाठी विशेषतः ग्रामीण भागात जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यामुळेच ही मोहिम सुरू करण्यात आली.
– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.