Published On : Sat, Apr 21st, 2018

सोमवारी शंकरनगर, गांधीनगरचा वीज पुरवठा बंद राहणार

Bulb

Representational pic


नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी सोमवार दिनांक २३ एप्रिल २०१८ महावितरणकडून शंकरनगर,डागा ले आऊट , गांधीनगर परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत शंकरनगर, डागा ले आऊट, गांधीनगर, माटे चौक, अत्रे ले आऊट, गोपाल नगर, वराडे पाटील ले आऊट, विमनातळ परिसर, हॉटेल प्राईड, सकाळी ८. ३० ते ११ या वेळेत दीनदयाल नगर,स्वावलंबी नगर, पडोळे चौक, त्रिमूर्तीनगर नासुप्र बगीचा, लोकसेवा नगर, प्रियदर्शनी नगर, भेंडे ले आऊट, सकाळी ७ ते १० या वेळेत पांडे ले आऊट, स्नेह नगर,नवीन स्नेह नगर, खामला, मालवीय नगर, गावंडे ले आऊट या परसातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी. महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे.

Advertisement