छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे @9 या कार्यक्रमासाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. सध्या ते छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर आहेत. यातच राज्यातील शिंदे आणि भाजप सरकारने १ वर्षाचा कार्यकाळही पूर्ण केला.याबाबत बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आपले सरकार स्थापन झाले.
औरंगाबादचं नाव हे आपण छत्रपती संभाजी नगर असे केले. छत्रपती संभाजी नगर हे नाव शरद पवारांना मान्य नाही. ते म्हणाले तुम्ही नाव काहीही करा मी औरंगाबादच म्हणणार, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. ते गंगापूर येथे बोलत होते.
वारसाहेब तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटले तरीही छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कुणीही काढू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आम्ही कधीच विसरु शकत नाही. आज वर्षपूर्तीच्या निमित्ताने या ठिकाणी आलो तेव्हा आपल्याला एक भेट दिली पाहिजे असे मला वाटले, असे फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीस यांनी आमदार प्रशांत बंब यांचे कौतुकही केले.