नागपूर. आजन्म सत्तेत राहण्याची शपथ घेऊन आलेल्या शरद पवारांची सत्तेच्या विना तडफड सुरु झाली. त्यांच्यामध्ये वैफल्यग्रस्तपणा आणि निराशा आली आहे. त्याच निराशेतून त्यांनी देशाचे लोकप्रिय गृहमंत्री आणि पहिले सहकारीता मंत्री अमित शाह यांच्याबाबत निषेधार्ह वक्तव्य केले, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.
शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवित ॲड. मेश्राम यांनी पवारांच्या वक्तव्याचा प्रसिद्धी पत्रकामधून चांगलाच समाचार घेतला.
ते म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे लोकप्रिय गृहमंत्री आणि पहिले सहकारीता मंत्री अमित शाह यांच्यावर केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. आजन्म सत्तेत राहण्याची शपथ घेऊन आलेल्या शरद पवारांची सत्तेच्या विना तडफड सुरु झाली. त्यांच्यामध्ये वैफल्यग्रस्तपणा निराशा आली आहे. याच निराशेतून अशा पद्धतीचे वक्तव्य शरद पवारांनी केल्याचे दिसते आहे. त्यांनी मधल्या काळात भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याशी झुंज घेण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांना कोणत्याही पद्धतीचे महत्व आणि प्रवेशाची संधी न मिळाली नाही. त्यामुळे बिथलेल्या शरद पवारांनी निराशेतून असे वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्राची सुबुद्ध जनता चांगलीच ज्ञात आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या जनतेने श्री. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारत शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेतृत्वाला झिडकारले आहे. हे पचेनाशे झाल्यामुळे शरद पवारांच्या तोंडातून अशा पद्धतीची निषेधार्ह वक्तव्य येत आहेत. महाराष्ट्राची जनता शरद पवारांच्या कार्यपद्धतीला, त्यांच्या नेतृत्वाला जाणून आहे. त्यामुळे यासर्व गोष्टींचा काहीही फरक भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावर किंवा सरकारच्या कामकाजावर पडण्याचा प्रश्नच येत नाही, असा विश्वासही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.