Advertisement
वाशीम : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार (NCP-SP) यांना वाशिम जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी आणि कृषी बाजार समितीच्या सभापती सई डहाके यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शनिवारी मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. दरम्यान, वाशिममध्ये शरद पवारांना मोठा झटका बसला आहे. माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी व कृषी बाजार समितीच्या सभापती सई डहाके यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
सई डहाके यांच्या भाजप प्रवेशामुळे वाशिम जिल्ह्यातील पक्ष अधिक मजबूत होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.