मुंबई :लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे. आपल्या उमेदवारांच्या प्रचासाठी पक्षांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली. आज शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली.
यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ४० प्रचारकांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे.या यादीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, रोहित पवार, सोनिया दुहान, पूजा मोरे यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून आतापर्यंत पाच उमेदवार जाहीर झाले. बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे,अहमदनगरमधून निलेश लंके, वर्ध्यातून अमर काळे आणि दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.