मुंबई: मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके हे सध्या जालन्यातल्या वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहे.
यादरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. पवार कुटुंबातील सदस्य रात्री-अपरात्री जाऊन मनोज जरांगे यांना भेटतात, पण ओबीसींच्या आरक्षणाबाबत एकदाही पवार कुटुंबातील कुठे जाताना दिसून येत नाही. त्यामुळे शरद पवार हे महाजातीयवादी आहेत, अशा शब्दात हाके यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
शरद पवार यांनी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.एकेकाळी ते राज्याचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. पण त्यांनी अनेक पदं केवळ घरातल्या लोकांना दिली. मंडल आयोग लागू होताना, शरद पवार हे मुख्यमंत्री होते.
त्यासंदर्भातील कायदा आधी महाराष्ट्रात कायदा पारित झाला, त्यानंतर इतर राज्यांनी तो कायदा पारित केला, अशावेळी शरद पवार यांनी पुढे येऊन आरक्षण हे मागासवर्गीयांचे आरक्षण आहे, असं म्हणायला हवं, पण ते असे काहीच बोलताना दिसत नाही,असेही हाके म्हणाले.