मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत बंडखोरी करत अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसोबत सत्तेत सहभागी झाले. महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.यासंदर्भांत बोलताना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले. शरद पवार हे अजित पवारांना व्हिलन ठरवत होते असा दावा त्यांनी केला.
शरद पवारांना भाजपासह युती करायची होती. तीनवेळा त्यांनी यासंदर्भातला निर्णय घेतला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी आपला निर्णय बदलला. शरद पवारांना भाजपासह युती करायची होती. तीनवेळा त्यांनी यासंदर्भातला निर्णय घेतला होता आणि नंतर तो फिरवला.
याबाबत आता मला असं वाटतं की शरद पवार हे नेहमी अजित पवारांना पुढे करायचे आणि त्यांना सगळ्या गोष्टींसाठी व्हिलन करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी शरद पवारांनी जशी मेहनत घेतली त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबरीने अजित पवारांनी मेहनत घेतली.
अजित पवारांना व्हिलन केले म्हणजे आपल्याला घरात कुणाला तरी हिरो करता येईल हे शरद पवारांना हवे होते,असे फडणवीस म्हणाले.