मुंबई : भाजप आणि शिंदे सरकारमध्ये आता अजित पवार आपल्या नऊ आमदारांसह सामील झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. यातच अजितदादांना पाठींबा देणार खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहित भाजपाबरोबर जाण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. पण, शरद पवार वेळेवर निर्णय घेण्यास अयशस्वी ठरले, असा गौप्यस्फोट खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात २०२२ च्या मध्यातच भाजपाबरोबर जाण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. पण, शरद पवार वेळेवर निर्णय घेण्यास अयशस्वी ठरले. यामुळे एकनाथ शिंदे यांनी संधी साधली आणि देवेंद्र फडणवीसांबरोबर जात सरकार स्थापन केले.
आमदार, नेते नाहीच तर र्यकर्तेही सरकारचा एक भाग बनले पाहिजे, या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला. अनेक आमदारांना मतदारसंघातील निधीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. पण, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्याने आता या समस्या उद्धवनार नाहीत, असे पटेल म्हणाले. आम्ही राष्ट्रहित आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपा आणि शिवसेनेसोबत आले असल्याचे पटेल म्हणाले.