मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पवार कुटूंब एकत्र आले होते. यात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. यानंतर राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या होत्या. यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात अनेकदा अडचणी असतात. वेळप्रसंगी आपल्याला संकटांनाही तोंड द्यावे लागते. मात्र काही दिवस असे असतात की संकटांचे विस्मरण करुन आनंदाने कुटुंबाच्या समवेत वेळ घालवावा. अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्याचा दिवस हा दीपावलीचा दिवस.
लोक या दीपावलीच्या काळात आनंद, उत्साहाने हा सण साजरा करतात. मी दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. व्यक्तीगत आणि कौटुंबिक आयुष्यात समृद्धी येओ. तसंच त्यांना यश मिळो अशा शुभेच्छा मी देतो,असे शरद पवार यांनी म्हटले आहे.