नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (२८ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ७ जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना काटोल विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे. त्यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख हे आता निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत.
दरम्यान, माण मतदारसंघासाठी प्रभाकर घार्गे, काटोल-सलील अनिल देशमुख, खानापूर-वैभव पाटील, वाई-अरुणादेवी पिसाळ, दौंड-रमेश थोरात, पुसद- शरद मेंद, सिंदखेडा-संदीप बेडसे यांच्या नावाचा समावेश आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याआधी तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.