नागपूर. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये पुरुष गटात शौर्य क्रीडा मंडळ आरमोरी व महिला गटात साई क्रीडा मंडळ काटोल संघाने विजय मिळविला. मानकापूर इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरु आहे.
मंगळवारी 14 जानेवारी रोजी झालेल्या पुरुषांच्या सामन्यांमध्ये शौर्य क्रीडा मंडळ आरमोरी संघाने साईराम क्रीडा मंडळ रामटेक 23-19 असा 4 गुणांनी पराभव केला. तर अन्य सामन्यात शक्ती जिम उमरेड संघाने क्रीडा संकुल सावनेर संघाचा 39-16 असा 23 गुणांनी पराभव करून विजय मिळविला.
महिलांच्या सामन्यात साई क्रीडा मंडळ काटोल संघाने सावित्रीबाई क्रीडा मंडळ नागपूर संघाला 28-15 ने मात देत सामन्यात 13 गुणांनी विजय मिळविला. अन्य सामन्यात मराठा लॉन्सर्स क्रीडा मंडळ नागपूर संघाने सीकेएस क्रीडा मंडळ हिंगणघाट संघावर 35-29 असा 14 गुणांनी विजय मिळवून स्पर्धेत आगेकूच केली.
दि. 14 जानेवारी 2024: खासदार क्रीडा महोत्सव निकाल
विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धा
इनडोअर स्टेडियम मानकापूर
पुरुष
1. शौर्य क्रीडा मंडळ अरमोरी मात साईराम क्रीडा मंडळ रामटेक (23-19)
2. शक्ती जिम उमरेड मात क्रीडा संकुल सावनेर (39-16)
3. ओम क्रीडा मंडळ नागपूर मात आझाद क्रीडा मंडळ मानेगाव (32-18)
4. साईराम क्रीडा मंडळ रामटेक मात विक्रांत क्रीडा मंडळ नागपूर(36-12)
5. शौर्य क्रीडा मंडळ आरमोरी मात विद्यार्थी युवक जुना सुभेदार (30-09)
6. गर्जना क्रीडा मंडळ वर्धा मात क्रीडा संकुल सावनेर (47-07)
महिला
1. साई क्रीडा मंडळ काटोल मात सावित्रीबाई क्रीडा मंडळ नागपूर (28-15)
2. त्रिरत्न क्रीडा मंडळ कामठी मात बीसीसी स्पोर्टिंग क्लब हिंगणघाट (29-04)
3. रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड मात शिव छत्रपती क्रीडा मंडळ हिंगणघाट (33-10)
4. मराठा लॉन्सर्स क्रीडा मंडळ नागपूर मात सीकेएस क्रीडा मंडळ हिंगणघाट (35-29)
5. गजानन क्रीडा मंडळ चक्रधर नगर नागपूर मात वाशिम जिल्हा असोसिएशन (20-03)
6. नागपूर सिटी पोलिस मात्र गुमथाळा क्रीडा मंडळ (18-02)