Advertisement
मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदारांच्या सोमवारी बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या सर्व १८ जागांवर दावा करण्याचा निर्णय खासदारांनी एकमताने घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. जागावाटपाची चर्चा आणि निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्याचा ठराव या बैठकीत झाला.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या.त्यानुसार पक्षाचे खासदार असलेल्या जागा मित्र पक्षांसाठी सोडू नयेत, अशी भूमिका यावेळी खासदारांनी मांडली.
लोकसभा निवडणूक प्रचारात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले निर्णय, समृद्धी महामार्ग, अटल सेतूसारख्या पायाभूत सोयीसुविधा याबाबत सर्वसामान्य जनतेपर्यंत माहिती देण्यात येणार आहे.