यवतमाळ :यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात झाला.अपघातात राठोड यांचा चालक जखमी झाला आहे. सुदैवानं गाडीच्या एयर बॅग वेळेवर उघडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हा अपघात इतका भीषण होता, की संजय राठोड यांच्या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.हा अपघात यवतमाळ वाशिम रोडवर शुक्रवारी पहाटे सव्वा दोन वाजताच्या सुमारास दिग्रस जवळील कोपरा याठिकाणी घडला.
दरम्यान वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी येथे 5 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकार्पण सोहळ्यानिमित्त येत आहेत.
याच कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मंत्री संजय राठोड हे पोरा देवी इथं गेले होते. दरम्यान रात्री दोन सव्वा दोन वाजता ते परत येत असताना पिक अप वाहन आणि त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.
मंत्री संजय राठोड यांच्या कारला पिकअपने मागून दिलेली धडक इतकी जोरदार होती की पीक अप वाहन पलटी होऊन त्याचा चालक गंभीर जखमी झाला. तर संजय राठोड यांच्या वाहनाचा समोरील भाग चक्काचूर झाला. वाहनातील एअर बॅग उघडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी चालकावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.