Published On : Mon, Feb 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विधान

Advertisement

पुणे : किल्ले शिवनेरीवर झालेल्या शिवजन्माच्या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवजी महाराज यांचे कौतुक करत अभिवादन केले. छत्रपती शिवराय आई भवानीला कौल मागण्याइतके धार्मिक होते. तेवढेच ते व्यवहारी आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी मायेने आपल्या प्रजेचा सांभाळ केला. छत्रपती शिवरायांनी तलवार हाती घेतली पण ती कधी निष्पापांच्या रक्ताने माखून दिली नाही. त्यामुळे शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो,असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले.

किल्ले शिवनेरीवर झालेल्या शिवजन्माच्या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थित होती.

Advertisement
Wenesday Rate
Wed 25 Dec. 2024
Gold 24 KT 76,300/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाची आठवण सांगताना शिंदे म्हणाले की, पाकिस्तानकडे तलवार रोखून धरणारा पुतळा पाहून माझ्या अंगात उर्जा संचारली. त्या पुतळ्याकडे पाहून पाकिस्तानची कधीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. लवकरच लंडनच्या वस्तुसंग्रहालयातील शिवरायांची वाघनखे भारतामध्ये आणली जाणार आहेत, असेही शिंदे म्हणाले.

शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवले. अन्याय करणारा कितीही मोठा असो देव, देश आणि धर्मासाठी लढणारा जिंकतो. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढायला शिकवले. आम्हीही शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे यावेळी फडणवीस म्हणाले.

Advertisement