• राष्ट्रवादीची गरज नाही
• बहुमत चाचणीत 184 मते पुन्हा मिळतील
राज्यात शिवसेना भाजपा युती अभंग आहे. राष्ट्रवादीची गरज आम्हाला पडेल असे वाटत नाही, असे स्पष्ट मत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त करून सद्याच्या राजकीय चर्चाना विराम दिला. ते म्हणाले, “मुळात शिवसेना-भाजप युती हेच जनतेचे मत आणि हाच जनतेचा कौल आहे.”
छत्रपती संभाजीनगर येथे ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. श्री. बावनकुळे म्हणाले, बहुमत चाचणी झाल्यास 184 मते पुन्हा मिळतील. त्यामुळे इतर कोणाचीही मदत घेण्याचा प्रश्नच येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची करत नाहीत, असे म्हणणे हा विपर्यास आहे. ते दोघेही राज्याच्या विविध भागात फिरून आढावा घेत असून शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी दुप्पटीने मदत केली आहे.
•अवमान केल्यासारखे होईल
अंजली दमनिया यांनी केलेल्या ट्विटला काहीही अर्थ नाही. त्यांची टिप्पणी म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान करण्यासारखे आहे. त्यामुळे मी त्यावर कोणतेही भाष्य करणार नाही.
•वरिष्ठाच्या सूचना नाहीत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा आहे, या प्रश्नाच्या उत्तरात श्री बावनकुळे म्हणाले की, याबाबत कुणालाही फोन आलेला नाही. आशीष शेलार दिल्लीला गेले असतील तर त्यांचं काही वेगळं काही काम असेल. भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला याबाबत काहीही सूचना केलेली नाही.
•वैयक्तिक टीकेला महत्व नको
लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार. मात्र वैयक्तिक टिप्पणीला महत्त्व द्यायला नको. तुम्ही सभांमध्ये तुमचे धोरणे मांडा, महाराष्ट्राचे व्हिजन मांडा मात्र वैयक्तिक टिका करणाऱ्यांना निपटवण्यास भाजपा सक्षम आहे.