नागपूर: २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नागपुरात आले आहे. भंडारा-गोंदियात होणाऱ्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यास ते शहरात आले होते. यावेळी शहरातील राजकीय चित्रात काही बदल घडून येणार, असे स्पष्ट होताना दिसत आहे.
या भेटी वेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांची मते जाणून घेतली. आगामी लोकसभा निवडणूक जर शिवसेना स्वतंत्र लढली तर काय परिणाम होतील? विधानसभा आणि लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काय ककरण्याची गरज आहे , यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावरुन शिवसेना नागपूरात भाजप विरूद्ध उभी राहू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना चक्क नितीन गडकरींच्या विरोधात उतरेल हे स्पष्ट दिसत आहे.
मात्र, नागपुरात शिवसेनेची पाहीजे तशी ताकद नाही, त्यामुळे शिवसेना लोकसभा निवडणूक जरी लढली, तरी त्यांच्या वाट्याला यश येणार नाही. मात्र, स्वतंत्र निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेने दंड थोपाटले आहे याकडे दुर्लऔ्ष करता येण्यासारखे पण नाही.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या नागपूर महानगरपालीका निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला अपयश आले. यावेळी नागपुरातून सेनेचे फक्त तीन नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर सेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर सतीश हरडे यांच्या जागेवर माजी खासदार प्रकाश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आता नागपूर लोकसभा मतदारसंघात आणखी एक जिल्हा प्रमुख असावा, अशी मागणी माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांनी बैठकी दरम्यान केली.
यादरम्यान, नागपुरातील कार्यकर्त्यांशी प्रथमच उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. या बैठकीला विदर्भातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काही कार्यकर्त्यांचे नाव बैठकीतून वगळल्यामुळे त्यांनी रविभवना बाहेर गोंधळ घातला. त्यात एका कार्यकर्त्याचे म्हणने होते की, त्याने शिवसेनेसाठी स्वतःवर केसेस ओढवून घेतले असतांनाही त्याचे नाव बैठकीतून वगळण्यात आले आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांची समजुत काढून गोंधळ शांत करण्यात आला.