मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल जाहीर केला. यात शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने आतापासूनच युद्धस्तरावर तयारी सुरु केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने विरोधकांचा कणा आता मोडला आहे. सरकार अधिक भक्कम झाले असून आगामी विधानसभेत शिवसेना 144 पेक्षा अधिक जागा जिंकणार, असा दावा शिंदे गटातील नेतेमंडळी करीत आहेत.
राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहे. केवळ सत्ताधारीच नाही तर इतर पक्षातील लोकप्रतिनिधींचाही ते आदरच करत. त्यांच्या या मनमिळावू स्वभावाची साऱ्या महाराष्ट्राला भुरळ पडली आहे. राज्यभरातून त्यांना पाठिंबा मिळत असल्याने शिवसेना पक्षाची ताकद वाढत आहेत.
देशात न्याय व्यवस्थेवरचा विश्वास आता अधिकचं दृढ झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे मोठ्या जोमाने आपला लोकाभिमुख कारभार करणार आहेत. संविधानावर विश्वास असणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. शिंदे यांनी केलेल्या हिंदुत्वासाठी केलेल्या बदल जनतेनेही पाठींबा दिल्याचे चित्र दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांचा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांच्यातील उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. या निकालामुळे आमचे सरकार घटनाबाह्य नाही हे सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.