Published On : Fri, May 4th, 2018

शिवसेनेची दखल; अक्षत मोहितेचा ‘नासा’ ला जाण्याचा संपूर्ण खर्च उचलणार

Advertisement

shivasena-logo
ठाणे: शालेय शिक्षण घेण्यासोबतच ‘अंतराळ’ विषयावर संपन्न झालेल्या शास्त्रज्ञांच्या सेमिनारमधील सहभागानंतर संशोधन करून अंतरीक्ष प्रकल्प बनविणारा ठाण्यातील अक्षत मोहिते या अकरावी इयत्तेतील तरुणाला अमेरिकेतील ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेत जाण्याचा संपूर्ण खर्च शिवसेना वहन करणार आहे. सॅक्झीमो (Psaximo) या अंतरीक्ष प्रकल्पाची अमेरीकेच्या ‘नासा’च्या नॅशनल स्पेस सोसायटीने दखल घेतल्यानंतर, अक्षतवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. याबाबतची माहिती मिळताच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अक्षतचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अक्षतच्या प्रकल्प सादरीकरणासाठीच्या अमेरिका वारीसाठीचा संपूर्ण खर्च उचलण्याच जाहीर केलं आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन येथे राहणारा अक्षत सध्या मुलुंड येथील महाविद्यालयात अकरावी सायन्समध्ये शिकतो. वला. या प्रकल्पाची थेट नासाने दखल घेतली तसेच, या प्रकल्पाचे सादरीकरण २४ ते २७ मे रोजी अमेरिकेच्या लॉस एंजल्समध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विकास परिषदेत करण्यासाठी निमंत्रण धाडले. याठिकाणी जगभरातून स्पर्धक येणार असून, भारतातून केवळ ४ मुलांची निवड करण्यात आली आहे, ज्यात अक्षत हा एकमेव मराठी मुलगा आहे.

अक्षतच्या या अमेरिका वारीसाठी भरमसाठ खर्च होणार असल्याने त्याच्या पालकांसमोर मोठा पेच उभा राहिला होता. याबाबतचे वृत्त प्रदर्शित होताच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अक्षतचा जाहीर सत्कार केला. तसेच, अक्षतच्या अमेरिकेला जाण्यायेण्यापासूनचा सर्व खर्च आमदार प्रताप सरनाईक यांनी उचलला आहे. यामुळे अक्षतच्या नासा वारीला मोठे पाठबळ मिळाले आहे.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement