शिवसेना शाखा बेला तर्फे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली,तिथीनुसार पार पडलेल्या जयंती कार्यक्रमाची सुरुवात साई सुंदर लॉन पोलीस स्टेशन बेला येथून झाली, उमरेड येथील ढोल ताशा पथक, व भगव्या झेंड्यांनी मिरवणूक मुख्य रस्त्यावरून, पुढे जात होती गावकरी मंडळींनी रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद दिला, रॅली च्या पुढे घोडे आणि ट्रॅक्टर वरती छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्तीची स्थापना करून महाराजांची शोभिवंत मूर्ती सोबत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक अतिशय, खेळीमेळीच्या वातावरणात पुढे सरकत होती
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ वंदना ताई बालपांडे, सामाजिक कार्यकर्त्या लोहकरे ताई, माधुरी ताई देशमुख, कीर्ती सुरणकर, गवते ताई व अनेक मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून रॅलीला सुरुवात झाली,
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता, बेल्याच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक लोकांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत वंदन केले,
रॅलीची सांगता मोठ्या बाजारातील बस स्टॅन्ड येथे करण्यात आली त्यावेळी ढोल-ताशा पथकाने अनेक आकर्षक कवायती करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, डोळ्याचे पारणे फिरणाऱ्या प्रात्यक्षिक आणि मधून ढोलताशा पथकाने बेळा वासीयांची मने जिंकली, रॅली संपल्यानंतर उपस्थितांना शिवसेना शाखा बेला तर्फे भोजन देण्यात आले,
राजू शुर्याविसी बेला