कन्हान : – परिसरातील गाव खेडयात व कन्हान कांद्री शहरात राजे छत्रपती शिव राय यांची ३९० वी जंयती महोत्सव शिव मिरवणुक, दुचाकी रैली, प्रबोधन आणि विविध कार्यक्रमासह ” जय जिजाऊ, जय शिवराय ” च्या जय घोषात थाटात साजरी करण्यात आली.
शिवशाही युवा ग्रुप कांद्री व चेतक पोटभरे मित्र परिवार कांद्री
पोटभरे निवास बस स्टाप कांद्री येथुन शिवशाही युवा ग्रुप कांद्री व चेतक पोटभरे मित्र परिवार कांद्री व्दारे राजे छत्रपती शिवराय जयंती निमित्य भव्य धुमाल बॅंड पथक शिव मिरवणुक काढुन कांद्री, संताजी नगर, तारसा चौक, आंबेडकर चौक, शिवाजी नगर कन्हान येथे शिवाजी महाराजांना माल्यार्पण व मानवंदना देऊन परत शिव मिरवणुक पोटभरे निवास कांद्री येथे महाप्रसाद वितरण करून शिवराय जयंती थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता चेतक सुरेश पोटभरे, केशव पोटभरे, दर्शन टिकम, गौरव भोयर, लेखराज पोटभरे, विवेक पारधी, प्रणय बावनकुळे, सेवक ठाकरे, कुणाल आंबिलढुके, बादल हिंगे, सागर कोठे, हितेश बागाईतकर, प्रिया पोटभरे, आरती पोटभरे, नेहा बागाईतकर, प्रियंका बागाई तकर, आर्या पोटभरे, किर्ती येळणे, पुर्वा बिसवास, ईभा बिसवास सह शिवशाही युवा ग्रुप व चेतक पोटभरे मित्र परिवार कांद्री च्या सदस्यानी परिश्रम घेतले.
“शिवराय मना मनात, शिवजयंती घरा घरात” कन्हान ला सुरूवात.
प्रगती नगर कन्हान येथील मराठा संघाचे शिवप्रेमी योगराज अवसरे हयानी आपल्या राहत्या घरी अंगणात रांगोळी काढुन राजे शिवरायांच्या धातुच्या प्रतिमेला डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे राज्य उपाघ्यक्ष शांताराम जळते, नगरपरिषद विरोधी पक्षनेते राजेंद्र शेंदरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छोटयाशा मुलाच्या हस्ते केक कापुन जय जिजाऊ, जय शिवराय चा जयघोष करून शिवजयंती साजरी करण्यात आली. तसेच अमित भुसारी व दिपक उघडे यांच्या घरी सुध्दा शिव जयंती साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे इयत्ता ६ वी ची विद्यार्थींनी कु चैताली भुसारी हिने सुंदर रांगोळीने राजे शिवरायांचे प्रतिरूप रेखाटले होते. घरा घरात शिवजयंती दिवाळी सारखा उत्सव साजरा करण्याची सुरवात करण्यात आली. याप्रसंगी मोतीराम रहाटे, राकेश घोडमारे, राजु रेंघे, भगवान कडु, पंकज उघडे, रितीक मोहबे, रोशन गजभिये, शांतनु वानखेडे, शौर्य हिंगे, तेजस चरपे, हर्ष गजभिये, चेतन ब्रम्हाणकर, स्वप्नील अवसरे, हिंगे ताई, ब्रम्हणकर ताई, कोटुरवार ताई, अवसरे ताई प्रामुख्याने उपस्थित होऊन शिवजयंती साजरी केली.
संत रविदास नवयुवक समिती कन्हान कांद्री कन्हान
संत रविदास नवयुवक समिती कन्हान कांद्री कन्हान व संत शिरोमणी रविदास सेना नागपुर व्दारे मतिमंद विद्यार्थ्याना फळ, बिस्कीट वितरण करून संत रविदास व राजे शिवराय यांची जयंती साजरी करण्यात आली.
राजीव कर्णबंधीर निवासी शाळा, वासनिक मतीमंद मुलामुलींची निवासी शाळा कांद्री कन्हान व उदयभान बोरकर मतीमंद कर्मशाळा कन्हान या दोन शाळेच्या विद्यार्थ्यांना फळ, बिस्कीटाचे संत शिरोमणी रविदास सेना चे उपाध्यक्ष राकेश छत्री, कोषाध्यक्ष रंजीत अहिरवार, संत रविदास नवयुवक समिती चे बंटी बुंदेलिया हयांच्या हस्ते वितरण करून संत रविदास व राजे शिवराय यांची सयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता अनिल चौधरी, संदिप बुंदेलिया, अक्षय कंभरे, आंनद बुंदेलिया, अनिल हटिले, देवेंद्र अहिरवार सह दोन्ही शाळेच्या शिक्षकवृंदानी सहकार्य केले.
“जय शिवराय ” मित्र मंडळ वराडा
१९ फेब्रुवारी ला सायंकाळी जि प उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात जय शिवराय मित्र मंडळ वराडा व्दारे राजे छ त्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला माल्या र्पण करून शिवजयंती कार्यक्रमास सुरू वात करण्यात आली. याप्रसंगी माजी सभापती देविदास जामदार, माजी उप सभापती देवाजी शेळकी, सरपंचा विद्या ताई चिखले, उपसरपंता उषाताई हेटे, ग्रा प सदस्य सिमा शेळकी, प्रभाताई चिंचुल कर, आशिष धुर्वे, क्रिष्णा तेलंगे, संजय टाले, राकेश काकडे, ग्रामसेवक निर्गुण शेळकी, धोंडबाजी चरडे, उपस्थित होते. मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जिव नावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यश स्विते करिता चेतन गि-हे, अमोल देऊळ कर, राहुल भालेराव, अनिकेत गि-हे, आशिष भालेराव, गौरव गि-हे, रोशन जामदार, हेमंत गि-हे, अभय वरठी,साक्षी शेळकी, पुष्पाताई घोडमारे, सुनंदा चरडे, भावना शेळकी, हर्षा चिखले व ग्रामस्था नी सहकार्य केले.
कन्हान परिसरातील पिपरी, टेकाडी, एंसबा,नांदगाव,बखारी,साटक, निमखेडा, बोरडा, गहुहिवरा, निस्तखेडा, खंडाळा (घटाटे) या गावोगावी शिव मिरवणुक व विविध कार्यक्रमाने शिव जयंती थाटात साजरी करण्यात आली.