मुंबई : आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वर्तुळात फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. अशोक चव्हाण यांच्यानंतर आणखी एका काँग्रेस नेत्याने भाजपात प्रवेश केल्याने भाजपच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेसला धक्का देत भाजपात प्रवेश केला आहे.
तर, शिवसेना ठाकरे गटातील करमाळ्याच्या महिला नेत्या रश्मी बागल यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.
रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी मंगळवारी दुपारी समर्थकांसह मुंबई येथे भाजपात प्रवेश केला. त्यानंतर, सायंकाळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रश्मी बागल यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली. तर, धाराशिवमधील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांनीही संध्याकाळी भाजपात प्रवेश केला.
दरम्यान या पक्षप्रवेशामुळे धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात भाजपाने लोकसभा निवडणुकांपूर्वीच आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.