Published On : Thu, Sep 21st, 2023
By Nagpur Today Nagpur News

धक्कादायक, महाराष्ट्रात सात महिन्यांत १,५५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या :विजय वडेट्टीवारांची माहिती

नागपूर विभागात १४४ शेतकरी आत्महत्या
Advertisement

मुंबई : सतत येणारा पूर, नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव न मिळणं अशा अनेक कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत. मागील सात महिन्यांमध्ये महाराष्ट्रात १,५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.याबाबत त्यांनी एक ट्वीट केले. राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलैपर्यंत तब्बल १,५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अमरावतील विभागात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या विभागात गेल्या ७ महिन्यांमध्ये तब्बल ६३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

Advertisement
Today's Rate
Wed 18 Dec. 2024
Gold 24 KT 76,900/-
Gold 22 KT 71,500/-
Silver / Kg 89,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर विभागात १४४ शेतकरी आत्महत्या – चंद्रपूर ७३ वर्धा ५० नागपूर १३ भंडारा ०५ गोंदिया ०३
अमरावती विभागात ६३७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या – अमरावती १८३ बुलढाणा १७३ यवतमाळ १४९ अकोला ९४ वाशीम ३८ औरंगाबाद विभागात ५८४ शेतकरी आत्महत्या बीड १५५ उस्मानाबाद (धाराशिव) १०२ नांदेड ९९ औरंगाबाद ८६ परभणी ५१ जालना ३६ लातूर ३५ हिंगोली २०
नाशिक विभागात १७४ शेतकरी आत्महत्या – जळगाव ९३ अहमदनगर ४३ धुळे २८ नाशिक ०७ नंदुरबार ०३
पुणे विभागात १६ शेतकरी आत्महत्या – सोलापूर १३ सातारा ०२ सांगली ०१ (पुणे आणि कोल्हापूर शून्य शेतकरी आत्महत्या) कोकण विभागात शेतकरी आत्महत्या नाही.
जून महिन्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या – जानेवारी २२६ फेब्रुवारी १९२ मार्च २२६ एप्रिल २२५ मे २२४ जून २३३ जुलै २२९.

Advertisement