Published On : Mon, Mar 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

धक्कादायक; नागपुरात मांजरीने चावल्याने अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू

नागपूर : मांजरीने चावा घेतल्याने अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. श्रेयांशु क्रिष्णा पेंदाम, असे मृत मुलाचे नाव आहे. माहितीनुसार, तालुक्यातील उखळी गावात श्रेयांशु हा शनिवारी(ता.९) सायंकाळच्या सुमारास मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता तेथे आलेल्या मांजरीने अचानक त्याच्यावर हल्ला करून त्यांच्या पायाला चावा घेतला. चावा घेतल्यानंतर श्रेयांशु घरी आला आणि घडलेला प्रकार आईला सांगितला.

उखळी गावात श्रेयांशु हा शनिवारी(ता.९) सायंकाळच्या सुमारास मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता तेथे आलेल्या मांजरीने अचानक त्याच्यावर हल्ला करून त्यांच्या पायाला चावा घेतला.चावा घेतल्याच्या काही वेळानंतर श्रेयांशुची प्रकृती बिघडली त्या उलट्या झाल्या.आई-वडिल त्याला लता मंगेशकर रुग्णालयात घेऊन आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तेथून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्स रुग्णालयात हलविण्यात आला. हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकेल,असे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.

Gold Rate
Saturday 01 March 2025
Gold 24 KT 85,300 /-
Gold 22 KT 79,300 /-
Silver / Kg 94,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मांजराने चावा घेतल्यानंतर इतक्या कमी वेळात मृत्यू होणे कठीण आहे. मांजराच्या हल्ल्यामुळे मुलगा घाबरल्याने त्याला ओकाऱ्या आल्या. ओकारी बाहेर न येता घशातून श्वसननलिकेत जाऊन श्वास रोखल्याने हृदयघात झाला असावा. मुलाचा नेमका मृत्यू कशामुळे हे आताच सांगणे कठीण आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर निश्चित कारण समोर येईल, असे हिंगणा तालुका वैद्यकीय अधिकारी प्रवीण पडवे यांनी म्हटले आहे.

Advertisement