Published On : Tue, Feb 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

धक्कादायकः शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे अश्लिल व्हिडिओ काढणाऱ्या नागपुरातील शिक्षकाला अटक!

पोलिसांना मोबाईलमध्ये सापडले 20 व्हिडिओ
Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षकाला शौचालय वापरणाऱ्या महिलांचे व्हिडिओ काढण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

सीताबर्डी येथील एका सांस्कृतिक केंद्रात 31 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी इतवारी येथील रहिवासी मंगेश खापरे (38) याला अटक केली.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यांनी सांगितले की, एका महिलेने खापरेला शौचालयाच्या खिडकीतून गुप्तपणे महिलांचे चित्रीकरण करताना पकडले. यानंतर आरडाओरडा करून महिलेने आसपासच्या लोकांना जमविले. त्यानंतर लोकांनी त्याला ताब्यात घेत चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधिन केले.
आरोपी शिक्षकाच्या फोनमध्ये सापडले 20 आक्षेपार्ह व्हिडिओ-

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीच्या मोबाईल फोनवर पोलिसांना 20 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. त्यांनी सांगितले की, आरोपी शिक्षक खापरे गेल्या वर्षी एका कार्यक्रमात अशाच प्रकारच्या घटनेत सहभागी होता.

Advertisement