नागपूर : गेल्या अनेक दशकांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले वरिष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा त्यांच्या गिरीपेठ येथील राहत्या घरी विहिरीत मृतदेह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ते ७२ वर्षाचे होते.
माहितीनुसार , अरुण फणशीकर दररोज मॉर्निंग वॉकला जायचे. आज सकाळीही ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले असताना ते घरी परतलेच नाही. त्यानंतर त्यांच्या कटुंबीयानी शोधाशोध सुरु केला.
सोशल मीडियावरही ते बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली होती. अचानक दुपारी २.३० वाजताच्या सुमरात त्यांच्या राहत्या घरी विहिरीत त्यांचा मृतदेहा आढळल्याने सर्व खळबळ निर्माण झाली. सीताबर्डी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी घटनेचा तपास सुरु केला आहे.
फणशीकर यांनी आत्महत्या केली की त्यांचा कोणी घातपात केला याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. तसेच पोलिसांच्या हाती कोणतेच सुसाईड नोटही सापडले नाही.
अरुण फणशीकर यांनी दि हितवाद, इंडियन एक्सप्रेस , हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले आहे.