Advertisement
श्री राम मंदिरात टिळक रोड, महाल नागपूर येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी श्रीरामाचा अभिषेक व पूजा करण्यात आली. ह. भ. प. सौ मृण्मयी कुलकर्णी यांचे कीर्तन झाले. त्यांनी या वेळी रामायणातील प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचे महत्व सांगितले.
तबल्यावर श्री सुमंत आमदेकर व हार्मोनिअम वर श्री प्रशांत उपगडे यांनी साथ दिली. मंदिराच्या प्रथे प्रमाणे दुपारी १२ वाजता श्री राम जन्मोत्सवाचा भव्य सोहळा करण्यात आला. प्रभू रामाला पाळण्यात घालण्यात आले. त्या नंतर महा आरती करण्यात आली.
यावेळी भावीकांची प्रचंड गर्दी झाली होती.