नागपूर – सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या प्रेरणेने उपासना मंडळाच्यावतीने श्री रामनाम स्वाहाकार यज्ञोत्सवाचा समारोप रविवार, दि. 12 जानेवारी रोजी स्वाहाकार यज्ञोत्सवाची पुर्णाहुती, नैवेद्य व आरती करून झाला. सकाळी 7 पासून सुरू असलेल्या या स्वाहाकार यज्ञोत्सवाची पुर्णाहुती दुपारी 2 पर्यंत आटोपली. यामध्ये शेकडो राम भक्तांनी आहुती दिली. यानंतर दुपारी 2 वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
दुपारी 3.15 ते 5.30 पर्यंत भागवताचार्य रामदासपंत आचार्य यांचे ‘श्री प्रल्हाद कथामृत’वर संगीतमय प्रवचन झाले. सायं. 6 ते 7 या वेळेत उपासना झाली. या त्रिदिवसीय उत्सवाचा समारोप भजन संध्याने झाला. विषेशतः सकाळी होणारे द्वादशीचे अभंग, रोजची काकड आरती सायं उपासना व भजन हे सर्व कार्यक्रम मंडळातील तरुण व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना देण्यात आली होती.
उपासना मंडळाच्यावतीने या त्रिदिवसीय श्रीरामनाम स्वाहाकार यज्ञोत्सवाचे आयोजन 10 ते 12 जानेवारीपर्यंत भक्तीमय वातावरणात पार पडले. या त्रिदिवसीय उत्सवात भक्तांची अलोट गर्दी उसळली. तीनही दिवस ‘श्रीराम जयराम जयजय राम’ या त्रयोदशाक्षरी तारक मंत्राच्या मंत्रोच्चाराने रविंद्रनगर हनुमान मंदिर परिसरात चैतन्यमय वातावरणाची निर्मिती झाली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता उपासना मंडळातील सदस्यांनी परिश्रम घेतले.
पहिल्या दिवशी गडकरींची उपस्थिती
पहिल्या दिवशी 10 जानेवारी रोजी रात्री 7 वाजता हभप संदीपबुवा माणके व हभप संकेतबुवा भोळे या दोन प्रसिद्ध कीर्तनकारांची ‘कीर्तन जुगलबंदी’ रंगली होती. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी भेट दिली. उत्सवासाठी साखरखेर्डा येथून आलेल्या प पू प्रल्हाद महाराजांच्या चरण पादुकांचे व यज्ञस्थळांचे दर्शन घेतले व मंडळाने केलेल्या या उपक्रमाची माहिती घेतली.
मंडळाच्यावतीने भागवताचार्य श्री रामदासपंत आचार्य महाराज यांच्या हस्ते श्री. गडकरींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच साखरखेर्डा संस्थान च्या वतीने संस्थानाचे विश्वस्त डॉ. कुळकर्णी यांनीही श्री. नितीन गडकरी यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. साखरखेर्डा येथे येण्यासाठी नियंत्रणही दिले.
—