नागपूर: नागपूर महानगर पालिका द्वारे येत्या १७ मार्च (शुक्रवार) रोजी , धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या सीपी क्लब -रवी नगर टी पॉईंट जवळ असलेल्या २०० मी मी व्यासाच्या -आईबीएम मुख्य जलवाहिनीवर १२ तासांचे शटडाऊन सकाळी ९ते रात्री ९ दरम्यान घेणार आहेत. ह्या शटडाऊन अंतर्गत २०० मी मी व्यासाची हि मुख्य जलवाहिनीवर टाकलेल्या १००० मी मी व्यासाच्या जलवाहिनी च्या अलाइनमेंट मध्ये येत आहे. १००० मी मी व्यासाची जलवाहिनी टाकल्यानंतर हि २०० मी मी व्यासाची जलवाहिनी पूर्ववत करण्यात येईल.
ह्या शट डाऊन १७ मार्च (शुक्रवारी) पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग : रवि नगर, पीडब्लूडी क्वार्टर्स , हाय कोर्ट न्यायाधीश बंगलो , सी पी क्लब , विभागीय आयुक्त निवास, रेल्वे enclave , सिबीआय कार्यालय , केम्ब्रिज रोड, गॅझेटेड ऑफिसर कॉलोनी, रामगिरी स्लम आणि इतर परिसर .
ह्या शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने, मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कुठंल्याही प्रकारच्या अधिक माहितीकरिता नागरिक नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर च्या नि:शुल्क मदत क्रमांक १८००- २६६-९८९९ वर संपर्क करू शकतात