नागपूर/कन्हान: ग्राम पंचायत कांद्री च्या उपसरपंच पदाकरिता झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे श्यामकुमार (बबलू ) बर्वे याना १३ मते तर भाजपचे शिवाजी चकोले याना ४ मते मिळाली. यामुळे निवडणुक अधिकारी हयानी श्यामकुमार बर्वे याना उपसरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले.
कांद्री ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदाकरीता काँग्रेस तर्फे बबलू बर्वे यांनी तर भाजप तर्फे शिवाजी चकोले यांनी नामांकन दाखल केले होते. यात बर्वे यांना १३ तर चकोले यांना ४ मते प्राप्त झाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी बबलू बर्वे यांची उपसरपंच म्हणून निवड घोषित केली.
यावेळी सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, माजी सरपंचा आशाबाई कनोजे, माजी उपसरपंच धनराज कारेमोरे सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, बैशाखु जनबंधु, प्रकाश चापले, राहुल टेकाम, शुभम झोडवाणे, सिंधुताई वाघमारे, सोनु खडसे, रेखा शिंगणे, दुर्गाबाई सरोदे, मोनाली वरले आदीचे नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष नरेश बर्वे, तालुका अध्यक्ष दयाराम भोयर, जि. प. सदस्य शिवकुमार यादव, कन्हान सर्कल अध्यक्ष गणेश माहोरे, वामन देशमुख, पंढरी सरोदे, राजु देशमुख आदीने पुष्पहाराने स्वागत करून अभिनंदन केले.