नागपूर : कुही हद्दीतील पाचगाव शिवारात सिल्वर लेक फार्म रिसॉर्ट नागपूर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली. रिसॉर्टमधील दृष्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या रिसॉर्टमध्ये झिंगाट पार्टी सुरू होती. अश्लील नृत्य सुरू होते. पोलिसांनी या प्रकरणात १३ डान्सर मुली आणि २३ पुरुषांवर कारवाई केली आहे. हे पुरुषमंडळी या मुलींवर पैशांची उधळण करत होते.
पोलिसांच्या कारवाईदरम्यान विदेशी दारूचा मोठा साठा तसेच रोकड देखील जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी सदर ठिकाणावरून ३८००/- रु. ची विदेशी दारू, नगदी रोख रक्कम, ५ चारचाकी वाहणे एकूण ४८,४८,८००/- रु चा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी कारवाईत रिसॉर्ट चालविणारा मालक राजबापू मुथईया दुर्गे (रा.नागपूर), मॅनेजर विपीन यशवंत आलेने (रा. जगनाडे चौक, नागपूर),अशील नृत्य करिता मुली पुरविणारा भुपेंद्र उर्फ मॉन्टी सुरेश अणे(रा . रामटेक), अभय वेंकटेश सकांडे (रा वर्धा), अतुल ज्ञानेश्वर चापले (रा मोठी अंजी वर्धा), शुभम ओमप्रकाश पवणीकर (रा जुनी मंगळवारी नागपूर), विशाल माणिकराव वाणी (रा जुनोना जी वर्धा), आशिष नथुजी सकांडे( रा गांधी नगर वर्धा), हर्षल भाऊराव माळवे ( रा मानस मंदिर वर्धा),विजय सदाशिव मेश्राम (रा तीगाव जी वर्धा),प्रवीण महादेवराव पाटील (रा मसाला वर्धा),अशोक तुकाराम चापडे (रा गजानन नगरी सेलू जी वर्धा),कौसर अली लियाकत अली सईद( रा केळझर जी वर्धा),)प्रशांत ज्ञानेश्वर घोगडे (रा जुना पाणी जी वर्धा),प्रवीण रामभाऊ बिडकर (रा रोठा जी वर्धा),सतीश उध्दव राव वाटकर (रा हिंगणी जी वर्धा),गजानन रामदास घोरे (रा पिंपळगाव ता बाळापूर जी अकोला),महेश महादेव मेश्राम (रा झडशी जी वर्धा),गोविंद जेठालाल जोतवांनी (रा साई मंदिर वर्धा),)राकेश विठ्ठलराव भांढेकर (रा खापरी वॉर्ड 2 जी वर्धा),अविनाश शंकरराव पंधरा म (रा बोरखेडी कला जी वर्धा),आकाश किसनाजी पिंपळे( रा झडशी जी वर्धा),राजेश रमेश शर्मा( रा दयाळ नगर अमरावती),संजय सत्तणारायन राठी( रा प्रताप नगर वर्धा )तसेच विभस्त नृत्य करणारे 13 महिला आरोपी असे एकूण 37 आरोपी पुरुष व महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान सादर कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्धार, अपर पोलीस अधीक्षक मा संदीप पखाले नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री.ओमप्रकाश कोकाटे ,सपोनि राजीव कर्मलवार, आशिषसिंग ठाकूर पो ,बटूलाल पांडे ,ASI/ चंद्रशेखर गाडेकर, ज्ञानेश्वर राऊत पो हवा.गजेंद्र चौधरी, अरविंद भगत,मयूर ढेकले, दिनेश अधपुरे, विनोद काळे,भुरे,भोयर,शेख,पोना:-अमृत किंनगे ,रोहन ढाखोरे महिला पोलिस नाईक वनिता शेंडे, कविता बचले , पोशी- राकेश तालेवार,नापोशी – शुक्ला यांनी केली.